फिरवला ना बुलडोझर! : युपीत योगीजी अन् महाराष्ट्रात देवेंद्रजी..!

– भाजपा आमदार महेश लांडगे यांची खणखणीत प्रतिक्रिया

– अत्याचाऱ्यांची खैर नाही; नराधम नौशाद शेखच्या अवैध बांधकामावर हातोडा

पिंपरी | प्रतिनिधी

अत्याचारी, नराधमांचा बिमोड करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली. चुकीची कामे करणाऱ्यांच्या अवैध बांधकामांवरती अक्षरश: बुलडोझर फिरवला. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थेतील मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नौशाद शेख सारख्या प्रवृत्तींना वचक बसवण्यासाठी त्याच्या अवैध बांधकामावरती हातोडा घातला. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, अशी खणखणीत प्रतिक्रिया भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्थाचालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पिंपरी-चिंचवडची बदनामी झाली. अनेक निष्पाप मुलींना अत्याचाराचा सामना करावा लागला. त्यामुळे नौशाद शेख याची संस्था आणि बांधलेली इमारत याबाबत चौकशी करून त्याला धडा शिकवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील हिंदुत्ववादी संस्था संघटना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या संस्थेच्या अतिक्रमणावर शुक्रवारी बुलडोझर चालविला आला.

आरोपी नौशाद शेखर याच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु केली. पोलिसांनी शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पॉस्को आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली. यानंतर अशा नराधमांच्या संस्थेवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी जाहीरपणे केली होती. अशा नराधमांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी यासाठी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील हा प्रकार घातला होता. त्यामुळे गृह खात्याकडून देखील या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. आमदार लांडगे यांनी इशारा दिल्याप्रमाणे आज महापालिकेच्या अनधिकृत कारवाई पथकाने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला.

******

प्रतिक्रिया :
रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संस्था चालक नौशाद शेख याने अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर अशा प्रवृत्तींना शहरात कदापि थारा देवू नये आणि संबंधितांच्या बेकायदा संस्था व बांधकामांवर बुलडोझर फिरवणार, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडकरांना जाहीरपणे दिली होती. आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्या संस्थेच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविला. याबाबत पोलीस आणि महापालिका प्रशसनाचे तमाम हिंदू समाज संघटनांकडून कौतूक आहेच. पण, या नराधमावर आणखी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भावना आहे.

– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी- चिंचवड.

  • Related Posts

    शालार्थ आईडी घोटाला: जांच समिति की रिपोर्ट अंतिम चरण में, बड़ा खुलासा जल्द होने की संभावना

    नागपुर: राज्य भर में चर्चित शालार्थ आईडी घोटाले की जांच अब अपने अंतिम पड़ाव पर है। जांच समिति की रिपोर्ट लगभग तैयार है, और जल्द ही यह साफ हो जाएगा…

    दिव्या देशमुख ने रैपिड एंड ब्लिट्ज टीम चैंपियनशिप के सेमीफाइनल मैच में विश्व की नंबर 1 होउ यिफान को हराया, पीएम मोदी ने दी बधाई

    नागपुर: लंदन में आयोजित FIDE वर्ल्ड रैपिड एंड ब्लिट्ज टीम चैंपियनशिप 2025 में उपराजधानी नागपुर की चेस खिलाडी दिव्या देशमुख ने ऐतिहासिक प्रदर्शन किया है। दिव्या ने ब्लिट्ज सेमीफाइनल में विश्व…

    You Missed

    चलती ट्रेन में चढ़ती महिला का फिसला पैर, आरपीएफ कर्मचारी ने दौड़ कर बचाया; टली दुर्घटना

    चलती ट्रेन में चढ़ती महिला का फिसला पैर, आरपीएफ कर्मचारी ने दौड़ कर बचाया; टली दुर्घटना

    व्यापार में नुकसान से हताश हुए व्यक्ति ने आत्महत्या का किया प्रयास, पुलिस की सतर्कता से बची जान

    व्यापार में नुकसान से हताश हुए व्यक्ति ने आत्महत्या का किया प्रयास, पुलिस की सतर्कता से बची जान

    न्यायपालिका को हर मामले में दखल देने की जरूरत नहीं, सीजेआई भूषण गवाई की महत्वपूर्ण टिप्पणी

    न्यायपालिका को हर मामले में दखल देने की जरूरत नहीं, सीजेआई भूषण गवाई की महत्वपूर्ण टिप्पणी

    लॉ कॉलेज में बने प्रिएंबल पार्क का भव्य उद्घाटन; CJI भूषण गवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रहे मौजूद

    लॉ कॉलेज में बने प्रिएंबल पार्क का भव्य उद्घाटन; CJI भूषण गवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रहे मौजूद

    नागपुर को मिला बंगलुरु और ग्वालियर से सीधा रेल संपर्क, नई एक्सप्रेस ट्रेन का हुआ शुभारंभ

    नागपुर को मिला बंगलुरु और ग्वालियर से सीधा रेल संपर्क, नई एक्सप्रेस ट्रेन का हुआ शुभारंभ

    मुख्य न्यायाधीश भूषण गवई का नागपुर आगमन

    फासे पारधी समाज की व्यथा को मिली आवाज: न्याय संकल्प परिषद में गंभीर मामलों पर सुनवाई

    फासे पारधी समाज की व्यथा को मिली आवाज: न्याय संकल्प परिषद में गंभीर मामलों पर सुनवाई

    ‘सेवा ही साधना है’ की राह पर अदाणी ग्रुप और डीएमआईएचईआर की साझेदारी, किफायती हेल्थ एजुकेशन को मिलेगा बढ़ावा

    ‘सेवा ही साधना है’ की राह पर अदाणी ग्रुप और डीएमआईएचईआर की साझेदारी, किफायती हेल्थ एजुकेशन को मिलेगा बढ़ावा

    तुकड़ोजी कैंसर अस्पताल में सुसज्जित कौशल प्रशिक्षण केंद्र का विभागीय आयुक्त के हाथों उद्घाटन

    तुकड़ोजी कैंसर अस्पताल में सुसज्जित कौशल प्रशिक्षण केंद्र का विभागीय आयुक्त के हाथों उद्घाटन

    नागपुर में ट्रैफिक पुलिस की सख़्ती, नियम तोड़ने वाली स्कूल बसों, वैन और ऑटो पर ताबड़तोड़ कार्रवाई